!!! कदम शिरीषकुमार जि. प. प्राथमिक शाळा मराठी मुले जामखेड जि. अहमदनगर माझ्या ब्लॉगवर आपले मनापासून खूप खूप सहर्ष स्वागत करीत आहे !!!...

Pages

!! तुकडोजीची वाणी !!

🌹🌹🌹🌹🌹🌹

!! तुकडोजीची वाणी !!

श्रोती याने केला प्रश्न !  खेडे शहराहूनी महान !  ऐसे म्हणतो आपण जन ! परी एक खूण न विसरावे  !! १ !!

शहरात आहे उच्च शिक्षण !
ते खेड्यात पावेल कोण ?  !
कोणी आला जरी शिकोन  !
तरी येथे होतो गावंढळ   !! २ !!
🌹🌹🌹📕📗📘📙📔📓🖊️🖋️✒️✏️📚📖
🌹

!! तुकडोजीची वाणी. !!


📙📘📗📕📔

नगरामाजी नागरची होईजे !
यासाठी शहरची  विद्यार्थी पाहिजे !
खेड्यामाजी नांगरची वाहिजे !
ऐसे होते     !! ३!!

🌹✒️🖋️🖊️🌹
 🌹🌹🌹🌹🌹

  !! तुकडोजीची वाणी. !!

📘📙📕📗📔

एेका ऐसी जयांची भावना  !
लक्ष द्यावे त्यांनी या वाचना. !
येथे शिक्षणाची मूळ कल्पना  !
तीच चुकली आपुली.  !! ४ !!

🌹✒️✏️🖊️🖋️🌹
 🌹🌹🌹🌹🌹

!! तुकडोजीची वाणी. !!

📙📘📔📗📕

दिखाऊ कपडे कोरडी ऐट  !
नोकर पेशी थाटमाट. !
हे शिक्षणाचे नव्हे उद्दिष्ट  !
हे ध्यानी घ्यावे नीट हे आधी  !! ५ !!

🌹✒️✏️🖊️🖋️🌹
 🌹🌹🌹🌹🌹

  !! तुकडोजीची वाणी !!

    📘📙📕📗📔

अजब ऐशी शिक्षणाची प्रथा !
जेथे कमी न ये बापाची संथा !
बाप करी शेतीची व्यवस्था    !
मुलगा मागे नोकरी.   !! ६ !! ......

      🌹✒️✏️🖊️🖋️🌹
 🌹🌹🌹🌹🌹

    !!  तुकडोजीची वाणी !!

       📘📙📕📗📔

व्हावे  मोठे  बापूसाहेब . !
काम जुजबी , पैसा खूब. !
मोठी पदवी , दिखाऊ ढब !
ही उच्चता म्हणोची नये. !! ७ !!

    🌹✒️✏️🖊️🖋️🌹
 🌹🌹🌹🌹🌹

    !! तुकडोजीची वाणी !!

       📘📙📕📗📔

हे सर्व मागील विसरोन !
मुला _ मुलींना द्यावे शिक्षण !
जेणे गावाचे वाढेल भूषण. !
सर्वतोपरी.  !! ८ !!

     🌹✒️✏️🖊️🖋️🌹🌹🌹🌹🌹🌹

    !!  तुकडोजीची वाणी. !!

        📘📙📕📗📔

नुसते नको उच्च शिक्षण !
हे तो गेले मागील युगी लपोन !
आता व्हावा कष्टिक , बलवान !
सपुत्र भारताचा       !! ९!!

     🌹✒️✏️🖊️🖋️🌹 🌹🌹🌹🌹🌹

    !! तुकडोजीची वाणी !!

       📘📙📕📗📔
शिक्षणातची जीवनाचे काम !
दोन्हींची सांगड व्हावी उत्तम !
चिंता नसावी भोजनासाठी दाम !
मागण्याची भीक जैसी   !!१०!!

    🌹✒️✏️🖊️🖋️🌹
 🌹🌹🌹🌹🌹

      !! तुकडोजीची वाणी. !!
       
          📘📙📕📗📔

मुला त एखादा तरी असावा गुण !
ज्याने पोट भरेल त्यात निपुण !
न ये संसारा माजी अडचण  !
कोणत्याही परी.  !! ११ !!

   🌹✒️✏️🖊️🖋️🌹
: 🌹🌹🌹🌹🌹

   !! तुकडोजीची  वाणी !!

         📘📙📕📗📔

जीवनाच्या गरजा संपूर्ण  !
निर्वाहाचे एकेक साधन. !
संबंधित विषयाचे समग्र ज्ञान  !
यांचा अंतर्भाव शिक्षणी   !!१२ !!

   🌹✒️✏️🖊️🖋️🌹
 🌹🌹🌹🌹🌹

!!  तुकडोजीची वाणी. !!

📘📙📕📗📔

नदी,तलाव आणि विहिरी !
यात पोहणे नानापरी. !
आपत्ती येता धावोनी तारी  !
ऐसे शिक्षण असावे.   !!१३!!

🌹✒️✏️🖊️🖋️🌹

No comments:

Post a Comment

thank you for your comment