!!! कदम शिरीषकुमार जि. प. प्राथमिक शाळा मराठी मुले जामखेड जि. अहमदनगर माझ्या ब्लॉगवर आपले मनापासून खूप खूप सहर्ष स्वागत करीत आहे !!!...

Pages

छत्रपती शाहू महाराज

राजर्षी छत्रपती शाहू महाराज अर्थात चौथे शाहू हे कोल्हापूर राज्याचे इ.स. 1884 - 1922 सालांदरम्यान छत्रपती होते. शाहू महाराज प्रभावी समाजसुधारक होते. शाहु महाराज सुधारणावादी होते.
                 
     शाहू महाराजांचा 26 जून हा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. यादिवशी कोल्हापूरमध्ये आणि राज्यभरात बरेच सार्वजनिक कार्यक्रम होतात.

                                 "रयतेचा राजा राजर्षी शाहू महाराज" 

                                   ●पूर्ण नाव :~ यशवंत आप्पासाहेब घाटगे
                                     ●जन्म :~ २६ जून इ.स.१८७४, कागल, कोल्हापूर
                                         ●राज्याभिषेक :~ २ एप्रिल १८९४,
                                            ●मृत्यू :~ ६ में १९२२ मुंबई
                                                ●राज्यव्याप्ती :~ कोल्हापूर जिल्हा



                                ◆ राजर्षी शाहू महाराज ◆

    चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे इ.स. १८८४- १९२२ सालांदरम्यान छत्रपती होते.

                               ◆ जन्मदिवस  ◆
    शाहू महाराजांचा २६ जून हा जन्म दिवस *‘सामाजिक न्याय दिवस’* म्हणून पाळला जातो. त्यादिवशी कोल्हापूरमध्ये आणि अन्यत्र काही ठिकाणी बरेच सार्वजनिक कार्यक्रम होतात.

                            ◆ प्रेरणादाई कार्य  ◆
    शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.

    ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.

    त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.

    स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात "महाराजांचे महाराज‘ असा गौरव होतो..शाहू महाराजांना "राजर्षी" ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.

     राजर्षी शाहू महाराजांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व कृषी-सिंचन या सर्वच क्षेत्रांतील कार्याचा दूरगामी परिणाम केवळ कोल्हापूर परिसरावरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर झालेला स्पष्टपणे जाणवतो. कोल्हापूर संस्थानाचे राजे असूनही त्यांनी लोकशाही पद्धतीने राज्यकारभार केला. डॉ. आंबेडकरांनी ‘सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ’ अशा समर्पक शब्दांत राजर्षी शाहूंचे वर्णन केले आहे.



No comments:

Post a Comment

thank you for your comment