!!! कदम शिरीषकुमार जि. प. प्राथमिक शाळा मराठी मुले जामखेड जि. अहमदनगर माझ्या ब्लॉगवर आपले मनापासून खूप खूप सहर्ष स्वागत करीत आहे !!!...

Pages

प्रार्थना

01. असो तुला देवा माझा

01. *❂ असो तुला देवा माझा ❂*
        ✶✶✹✹★●★✹✹✶✶

असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥

तुझ्या कृपेने रे होतील फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥

तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥

तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरी मिळेल
तरी प्रभो ! शतजन्मांची मतृषा शमेल
तुझे म्हणुनी आलो राया ! बघत बघत दार

असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार

02. संपू दे अंधार सारा

02. *❂ संपू दे अंधार सारा ❂*
      ✶✶✹✹★●★✹✹✶✶

          *संपू दे अंधार सारा*
              उजळू दे आकाश तारे
       *गंधाळल्या पहाटेस येथे*
                 वाहू दे आनंद वारे....

       *जाग यावी सृष्टीला की*
             होऊ दे माणूस जागा
     *भ्रष्ट सारे नष्ट व्हावे*
              घट्ट व्हावा प्रेम धागा...

       *स्वच्छ सारे मार्ग व्हावे*
             अन् मने ही साफ व्हावी
        *मोकळ्या श्वासात येथे*
             जीवसृष्टी जन्म घ्यावी...

       *स्पंदनांचा अर्थ येथे*
               एकमेकांना कळावा
      *ही सकाळ रोज यावी*
            माणसाचा देव व्हावा....

03. देह मंदिर चित्तमंदिर

03. *❂ देह मंदिर चित्तमंदिर ❂*
        ✶✶✹✹★●★✹✹✶✶

देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

4. *❂ हे करुणाकरा ❂*

04. *❂ हे करुणाकरा ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶

हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई
तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥

तूही आदि तू अनंत । तूही दु:स्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥

05. गगन, सदन तेजोमय

05. *❂ गगन, सदन तेजोमय ❂*
        ✶✶✹✹★●★✹✹✶✶

गगन, सदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश, देई अभय

छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वार्‍यातून, तार्‍यांतुन
वाचले तुझेच नाम
जग, जीवन, जनन, मरण
हे तुझेच रूप सदय

वासंतिक कुसुमांतून
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतुन
प्रेमरूप भासतोस
कधि येशील चपलचरण
वाहिले तुलाच हृदय

भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ
भावमधुर गीत नवे
सकल-शरण, मनमोहन
सृजन तूच, तूच विलय

08. देह मंदिर, चित्तमंदिर

08. *❂ देह मंदिर, चित्तमंदिर ❂*
        ✶✶✹✹★●★✹✹✶✶

देह मंदिर, चित्तमंदिर,
 एक तेथे प्रार्थनासत्य सुंदर 
मंगलाची नित्य हो आराधनादु:खितांचे 
दु:ख जावो ही मनाची कामनावेदना 
जाणावयाला जागवू संवेदनादुर्बलांच्या रक्षणाला
 पौरूषाची साधनासत्य सुंदर
 मंगलाची नित्य हो आराधनाजीवनी
 नवतेज राहो अंतरंगी भावनासुंदराचा 
वेध लागो मानवाच्या जीवनाशौर्य लाभो,
 धैर्य लाभो, सत्यता संशोधनासत्य सुंदर
 मंगलाची नित्य हो आराधनाभेद सारे
 मावळू द्या वैर सार्या वासनामानवांच्या 
एकतेची पूर्ण होवो कल्पनामुक्त
 आम्ही फक्त मानू बंधुतेच्या
 बंधनासत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

No comments:

Post a Comment

thank you for your comment